Vidnyan Ranjan Spardha 2020 विज्ञान रंजन स्पर्धा 2020

ही प्रश्नावली मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेत उपलब्ध आहे. मात्र स्पर्धकांनी उत्तरे मराठीत लिहूनच पाठवावी विज्ञान रंजन स्पर्धा 2020 - केवळ एक स्पर्धा नाही. ज्ञान मिळवण्याचे विविध मार्ग अजमावून बघण्याची संधी आहे. आपल्या दैनंदिन जगण्यात उत्तरे मिळतील असे प्रश्न यात विचारले आहेत. 10 रुपयाच्या नाण्याचं वजन किती? हुरहूर वाटते तेव्हा शरीरात बदल काय होतात? अॅक्सिस बँकेच्या रंगाचं नाव काय? किटलीत पाणी तापवताना वाढणारा आवाज उकळी फुटली की का थांबतो? समुद्राची हद्द कशी ठरवतात? गालावर खळी पडणे अनुवंशिक आहे का? हे तपासा - यांसारखे कुतूहल जागवणारे या प्रश्नावलीत आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नाही, वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, परिक्षा केंद्र नाही, एकाच जागी बसून ठराविक वेळात बसून लिहीण्याची सक्ती नाही. आपापल्या सवडीने जमेल तेव्हा उत्तर लिहायची. 15 फेब्रुवारी पर्यंत मराठी विज्ञान परिषदेकडे पाठवायची. 1 मार्च रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे या स्पर्धेची अंतिम फेरी होऊन उत्तम प्रयत्नांना बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊन आपला वैज्ञानिक ...